'बंजारा भूषण' पुरस्काराने मंत्री संजय राठोड होणार सन्मानित : आज गेवराईत मेळावा

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना यावर्षीचा राज्यस्तरीय 'बंजारा भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Banjara Bhushan' award
'बंजारा भूषण' पुरस्काराने मंत्री संजय राठोड होणार सन्मानित : आज गेवराईत मेळावाfile photo
Published on
Updated on

Minister Sanjay Rathore to be honored with 'Banjara Bhushan' award: Gevrai meeting today

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांना यावर्षीचा राज्यस्तरीय 'बंजारा भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार आज रविवार, दि. 26 जुलै रोजी दुपारी 1 वाजता गेवराई येथील गजानन लॉन्स, कोल्हेर रोड येथे आयोजित भव्य बंजारा जागृती मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संजय राठोड राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज, आमदार रोहित पवार, आमदार विजयसिंह पंडित, माजी मंत्री बदामराव पंडित, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळराजे पवार, प्रा. फुलसिंगजी जाधव तसेच प्रसिद्ध वक्ते संजयभाऊ चव्हाण (सोलापूर) यांची उपस्थिती लाभणार आहे.

Banjara Bhushan' award
Beed news : दिंद्रुड परिसरातील बळीराजाला मोठ्या पावसाची प्रतीक्षा

पत्रकात प्रा. पी. टी. चव्हाण यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांचे निस्सीम भक्त असलेले संजयभाऊ राठोड यांनी पोहरादेवीच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे.

Banjara Bhushan' award
Beed News : बीड जिल्ह्यातील ९७ हजार शेतकऱ्यांना झाली कर्जमाफी

या मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन महानायक वसंतरावजी नाईक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय बंजारा महासंघाचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष प्रा.पी. टी. चव्हाण, उत्तम चव्हाण, अण्णासाहेब राठोड, लक्ष्मण चव्हाण, बाबुराव जाधव, सुशील पवार, सरपंच विष्णू राठोड, हरिभाऊ महाराज राठोड आदी पदाधिकाऱ्यांनीही उपस्थितीचे आवाहन केले आहे..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news