

Minister Pankaja Munde reviewed the damage caused by the rains at the District Collector's Office.
बीड, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अथवा पुरांमुळे बाधित झालेला एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी सूचना राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी आढावा बैठकीत बोलताना केली.
जिल्हयात नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे तसेच जिवीत व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले, यासंदर्भात झालेले नुकसान व पंचनाम्याची सद्यस्थिती याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान तसेच सर्व उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पंकजा मुंडे यांनी बैठकीत जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या नुकसानीची संपूर्ण माहिती जाणून घेतली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यात १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती सादर केली. त्यामध्ये शेती पिक नुकसान, मनुष्य मृत्यु जनावरे मृत्यु याबाबतचा तालुकानिहाय आढावा सादर केला. पंकजाताई म्हणाल्या, शेत पिक नुकसान पंचनामा करताना ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही, परंतु शेती पिकांचे नुकसान आहे त्या ठिकाणचे सविस्तर पंचनामा सर्व्हे करुन अहवाल दिले.
शासनास सादर करावा, जमीन खरडून गेलेल्या क्षेत्राचे वस्तुनिष्ठ व अचूक पंचनामा करुन एकही बाधीत शेतकरी बंचित राहणार याची दक्षता घ्यावी, जनावरे मृत्यू झालेल्या प्रकरणी (वाहून गेलेल्या) त्यांचे इअर टॅगिंग क्रमांक किंवा खरेदी पावती किंवा दवाखान्यामध्ये ने-लेली नोंद याचा वापर करुन मदत देण्याची कार्यवाही करावी, विहीरींचे पंचनामे करुन सविस्तर अहवाल शासनास सादर करावा. ज्या पुलांची उंची कमी आहे त्यांची उंची वाढविण्याचा प्रस्ताव व वाहून गेलेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव सर्व्हे करुन शासनास आठ दिवसात सादर करावा असे आदेश त्यांनी दिले.