Beed News : माता-बाल संगोपन रुग्णालय लवकरच होणार कार्यान्वित

बीड : फर्निचर, सिलिंग, ऑक्सिजन पाईपलाईनसाठी पावणेदोन कोटीचा निधी मंजूर
Beed News
Beed News : माता-बाल संगोपन रुग्णालय लवकरच होणार कार्यान्वितFile Photo
Published on
Updated on

Maternal and Child Care Hospital to be operational soon

बीड, पुढारी वृत्तसेवा बीड जिल्हा रुग्णालय परिसरात २०१६-१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत मंजूर झालेले १०० खाटांचे माता व बाल संगोपन रुग्णालय तब्बल २१ कोटी खर्चुन २०२३ मध्ये पूर्ण झाले. मात्र गेली दोन वर्षे निधीअभावी लिफ्ट फर्निचर, सिलिंग आणि ऑक्सिजन पाईपलाईनची कामे रखडली असल्याने ही इमारत धूळखात पडून होती. परंतु आता निधी मंजूर झाल्याने रुग्णालय कार्यान्वीत होण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे.

Beed News
Beed Crime | येवलवाडीतील जालिंदरनाथ देवस्थानात धाडसी चोरी!

सदर प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख डॉ. गणेश ढवळे लिबागणेशकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २ वर्षांपासून सतत निवेदने, आंदोलनाद्वारे हा विषय सातत्याने पुढे आणला होता.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय राऊत यांना निवेदन देत, निधी तातडीने उपलब्ध न झाल्यास 'पालकमंत्री अजितदादा के नाम पे देदे बाबा' लक्ष्यवेधी भिक मागो आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला होता. या पाठपुराव्यानंतर अखेर जिल्हा नियोजन समितीकडून खालीलप्रमाणे निधी मंजूर करण्यात आला फर्निचर ९८ लाख ५ हजार, सिलिंग काम ४९ लाख ५ हजार, ऑक्सिजन प्लांट ते इमारत पाईपलाईन २५ लाख, एकूण १ कोटी ७३ लाख (पावणे २ कोटी रुपये) पालकमंत्री अजित पवार यांचे आभार डॉ. ढवळे बीड जिल्हा रुग्णालयाची सध्याची क्षमता ३२० खाटांची आहे, तर प्रत्यक्षात रुग्णसंख्या ४५० च्या घरात असते.

Beed News
Beed Politics |मतमोजणीच्या उंबरठ्यावर गेवराई शहरात राजकीय वातावरण तापले; धाकधूक शिगेला

प्रसूती व प्रसूती-पश्चात विभागात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण असल्याने गर्भवती महिलांना अनेकदा खाट उपलब्ध होत नाही. या परिस्थितीत १०० खाटांच्या स्वतंत्र माता-चाल रुग्णालयामुळे महिलांना आणि बालकांना स्वतंत्र, सुरक्षित व सुसज्ज उपचारसुविधा मिळणार आहेत. फर्निचर व सिलिंग कामांसाठी पावणे दोन कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आभार असल्याचे, उर्वरित कामांसाठीही पाठपुरावा आवश्यक राहणार आहे. डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news