मस्साजोगच्या गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन सुरु!

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी
Santosh Deshmukh Murder Case
मस्साजोगमधील सामुहिकरित्या जलसमाधी आंदोलन करत आहेत.Pudhari Photo
Published on
Updated on

केज : संतोष देशमुख यांची हत्या होवून आज २२ दिवस झाले आहेत, परंतु अद्यापही या हत्येच्या कटामध्ये सामील असणाऱ्या आरोपींना पोलिस पकडू शकले नाहीत. त्यामुळे नागरिकांनी जलसमाधी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.तसेच हत्येच्या मागील मास्टर माईंड वाल्मीक कराड याच्यावर देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करावा ही त्यांची मागणी आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Santosh Deshmukh Murder Case | देशमुख हत्याकांडाचे सूत्रधार कोण?; खोलात जावे लागेल; शरद पवार 'मस्साजोग'मध्ये काय म्हणाले?

संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले (२६ वर्ष) (रा. टाकळी ता. केज) आणि त्याचे साथीदार कृष्णा शामराव आंधळे (२७ वर्ष) मैंदवाडी (ता. धारूर), सुधीर सांगळे (वर्ष) रा. टाकळी ता. केज) हे तीन आरोपी फरार आहेत.यांना पकडण्यात तपास यंत्रणेला अपयश आलेले आहे.

Santosh Deshmukh Murder Case
केज-बीड मार्गावरील मस्साजोग येथे अपघात; चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार | kaij-Beed Road Accident

तसेच हत्येचा मास्टर माईंड वाल्मीक कराड याच्यावर देखील संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात तपास यंत्रणेला अपयश आलेले असल्याने संतप्त नातेवाईक गावकऱ्यांनी दि. १ जानेवारी रोजी सामूहिक जलसमाधी घेणार असल्याचे निर्णय घेतला आहे. आज मस्साजोगच्या तलावात महिला व पुरुष उतरले असून जलसमाधी आंदोलन सुरू झाले आहे. संतप्त महिला आणि पुरुष यांनी रोष व्यक्त करीत पाण्यात उतरले आहेत. यावर लवकरच प्रशासनाने आरोपींना अटक करुन गुन्हा नोंद करावा अन्यथा जलसमाधी घेणार असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news