Massajog sarpanch by election : मस्साजोगमध्ये सरपंच पदासाठी दोन देशमुख उतरले रिंगणात

स्व. संतोष देशमुख हत्येनंतरची पोटनिवडणूक; बिनविरोध होणार का ?
Massajog sarpanch by election
Massajog sarpanch by electionpudhari photo
Published on
Updated on

केज : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीला आता निर्णायक वळण मिळाले असून अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने या लढतीला विशेष भावनिक आणि राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे.

9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्यानंतर गावावर शोककळा पसरली होती. त्या घटनेनंतर जवळपास वर्षभर सरपंचपद रिक्त राहिले. आता या पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्याने गावातील राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.देशमुख कुटुंबाने ग्रामस्थांशी चर्चा करून सहानुभूतीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

Massajog sarpanch by election
Chandrapur Mayor Election | चंद्रपूर महापालिका : महापौर - उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण

माजी सरपंच म्हणून त्यांचा अनुभव आणि कुटुंबाला असलेला पाठिंबा यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे प्रयत्नही सुरू होते. मात्र, मागील निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी पुन्हा मैदानात उतरत अर्ज दाखल केल्याने लढत रंगतदार झाली आहे.

दरम्यान, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाती निधनामुळे गावात शोककळा असतानाच अश्विनी देशमुख यांनी अत्यंत साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.या ग्रामपंचायतीत सुमारे 2,284 मतदार असून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल असल्याने अंतिम उमेदवारांचे चित्र त्यानंतर स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या घडीला ही निवडणूक ‌‘सहानुभूती विरुद्ध राजकीय आव्हान‌’ अशी रंगणार असल्याची चर्चा गावात रंगली आहे.

Massajog sarpanch by election
Ulhasnagar Mayor Election : महापौर–उपमहापौर बिनविरोध? शिवसेना–भाजपच्या युतीने सत्ताकारणात उलटफेर

स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली भावनिक लाट, देशमुख कुटुंबाची पकड आणि दुसरीकडे विरोधकांचे आव्हान यामुळे मस्साजोगची ही पोटनिवडणूक केवळ स्थानिक न राहता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. आगामी काळात या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news