पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचे लैंगिक शोषण; विवाहित तरुणाविरोधात गुन्हा

Beed Crime News | केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
married woman assaulted
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

केज : पुढारी वृत्तसेवा : केज येथे पतीपासून विभक्त राहत असलेल्या दोन मुलांची आई असलेल्या महिलेला फसवून तिचे लैंगिक शोषण केले. या प्रकरणी एका विवाहित तरुणाविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेला दोन विवाहित मुले असून आरोपीलाही दोन मुले आहेत. (Beed Crime News)

या बाबतची माहिती अशी की, धारूर तालुक्यातील एक महिला ही तिच्या पतीपासून विभक्त राहत आहे. तिला दोन मुले असून ती ऊसतोडीचे काम करून चरितार्थ चालवितात. ऊस तोडणीचे काम करीत असताना तिची ओळख केज तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हर सोबत झाली. त्यातून ऊस तोडणी काम संपल्या नंतर ते दोघे केज येथे भाड्याच्या घरात पती-पत्नी प्रमाणे एकत्र राहत होते. त्या तरुणाचे देखील लग्न झालेले असून त्यालाही दोन मुले आहेत. परंतु तरुणाने तिला फसवून तिच्या सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे लैंगिक शोषण केले. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी गोविंद जाधव याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करीत आहेत.

married woman assaulted
बीड : लिंबाच्या झाडावर वीज कोसळून वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news