

केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील केकाणवाडी येथे वीज पडून वृद्ध शेतकरी आणि गाय दगावली. देविदास शहाजी केकाण (वय ६५, रा. केकाणवाडी) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज (दि.३) दुपारी ४. ३० च्या सुमारास घडली. (Beed News)
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज दुपारी ४. ३० च्या सुमारास आडस, केकानवाडी या भागात विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी देविदास आसरडोह रस्त्यानजीकच्या नवरुका नावाच्या शिवारात जनावरे चारीत होते. यावेळी अचानक पाऊस सुरू झाल्याने ते लिंबाच्या झाडाखाली उभे होते. या झाडावर वीज कोसळल्याने देविदास यांचा मृत्यू झाला. तर त्यांची गायही दगावली.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या सुचनेनुसार तलाठी शिंदे घटनास्थळी दाखल झाले. आडस येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.