

Married woman ends life by hanging herself
अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा
पतीसह सासरच्या लोकांकडून पैशासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गित्ता गावामध्ये गुरुवारी सकाळी घडली. या प्रकरणात बर्दापूर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शुभांगी संतोष शिंदे (२५) असे गळफास घेवून आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. संतोष शिंदे याचे अंबाजोगाई व धारुर येथे ऑप्टीकलचे दुकान असून गेल्या काही दिवसांपासून संतोष हा पत्नी शुभांगीचा छळ करत होता. शुभांगीचे सासरे विलास शिंदे, सासु सुमन शिंदे, नणंद सिमा शिंदे व संदिप काचगुंडे हे देखील शुभांगीला माहेरहून पैसे घेवून येण्यासाठी त्रास देत होते.
या दरम्यान माहेरच्या मंडळींनी चार लाख रुपये दिल्याचे देखील म्हटले असून आणखी दोन लाख रुपयांची मागणी या लोकांकडून होत होती. रोजच होणार्या या छळाला कंटाळून शुभांगीने गळफास घेवून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माहेरच्या नातेवाईकांनी आक्रमक पावित्रा घेत गुन्हा दाखल झाल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असे म्हटले होते.
परंतु पोलिस अधिकार्यांनी समजूत घातल्यानंतर अंबाज- ोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर रात्री उशीरा या प्रकरणात पती संतोष शिंदे याच्यासह विलास शिंदे, सुमन शिंदे, सिमा शिंदे व संदिप काचगुंडे यांच्या विर- ोधात शुभांगीचा भाऊ प्रदिप सोळंके (रा. मोहखेड) याने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय राजकुमार ससाणे हे करत आहेत.