

केज : अंगणात सायकल खेळत असलेल्या अल्पवयीन मुलीस मोबाईलचे अमिष दाखवून घरामागे शेतात देऊ तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांनी हा महत्वपूर्ण निकाल दिला.
या घटनेची माहिती अशी की, दि. २२ मार्च २०२३ रोजी दुपारी ३:०० च्या सुमारास केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी अंगणात खेळत असताना नागनाथ शहाजी शिंदे याने तिला मोबाईल दाखवतो असे म्हणून घराच्या मागे असलेल्या शेतात नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि जिवे मारण्याची धमकी दिली.
पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात येथे आरोपी नागनाथ शहाजी शिंदे यांच्या विरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्या फिर्यादी वरुन तात्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस. के. कोळी यांनी या प्रकरणाचा तपास करून सत्र न्यायालय केज येथे दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावनी मा. सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांच्यासमोर झाली. आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण ९ साक्षीदार तपासण्यात आले.
या प्रकरणात पिडीता, तिची आई, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच सरकार पक्षाचे दाखल केलेले सक्षम पुराव्याचे व कागदोपत्रांचे अवलोकन करुन व सहायक सरकारी वकील ॲड. राम बिरंगळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. सत्रन्यायाधीश कुणाल डी. जाधव साहेब यांनी आरोपी नागनाथ शहाजी शिंदे याला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ४ व ६ प्रमाणे आजन्म कारावास व एकुण ५० हजार रु दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी वकिल ॲड. राम बी. बिरंगळ यांनी काम पाहिले व त्यांना सहायतक सरकारी वकिल ॲड. आर.पी. उदार यांनी सहकार्य केले. तसेच त्यांना पैरवी महिला अधिकारी तथा पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीमती बनसोडे यांनी सहकार्य केले.