

Ambajogai Bus stand Accident Man Death
अंबाजोगाई: अंबाजोगाई बस स्थानकामध्ये बसखाली सापडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि. २९) सकाळी घडली. अंकुश मोरे (रा. धानोरा बुद्रुक) असे मृताचे नाव आहे. बसच्या चालकाने स्वतः अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची माहिती दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी लातूरहुन आलेली बस (MH१४ MH१७०१) अंबाजोगाई बस स्थानकात जात होती. यावेळी अंकुश मोरे या बसच्या मागील बाजूस पडून दोन्ही टायरच्या मध्ये आल्याने त्याच्या पायावरून बसचे मागील चाक गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अंबाजोगाई येथील रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला
लातूर येथे मुक्कामी असलेली श्रीगोंदा आगाराची लातूर - पुणे ही बस अंबाजोगाई बस स्थानकाता जात असताना प्रवेशद्वाराच्या जवळच ही घटना घडली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.