Beed News : गड्या हो, मी पण तुमचाच समाजबांधव ना?'

महादेव मुंडेंच्या बॅनरने बीडमध्ये पुन्हा न्यायाचा सवाल
beed news
गड्या हो, मी पण तुमचाच समाजबांधव ना?' file photo
Published on
Updated on

Mahadev Munde's banner raises the question of justice in Beed once again

बीड, पुढारी वृत्तसेवा : परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. शहरातील एका ठिकाणी स्व. महादेव मुंडे यांच्या छायाचित्रासह लावण्यात आलेल्या बॅनरवरील मजकुराने समाजमनाला अस्वस्थ करणारा सवाल उपस्थित केला आहे. 'गड्या हो, मी पण तुमचाच समाजबांधव ना? माझ्यासाठी कधी रस्त्यावर उतरणार?' असा थेट सवाल या बॅनरवर करण्यात आला आहे.

beed news
Vilas Ghule murder case : विलास घुले प्रकरण : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला बराच कालावधी उलटूनही त्यांच्या कुटुंबीयांचा न्यायासाठीचा संघर्ष कायम आहे. यापूर्वीही त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या हत्येतील आरोपींना अटक करून न्याय मिळावा, यासाठी विविध माध्यमातून आवाज उठवला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर झळकलेल्या बॅनरने 'इतर प्रकरणांसाठी समाज रस्त्यावर उतरतो, मग महादेव मुंडेंसाठी का नाही?' असा भावनिक आणि अंतर्मुख करणारा प्रश्न उपस्थित केला आहे.

'माझ्यासाठी रस्त्यावर कधी उतरणार?' या वाक्यामुळे बॅनरची चर्चा परळी शहरात सुरू झाली आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येचा तपास आणि त्यामागील सत्य समोर यावे, दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांकडून विविध दिशांनी तपास सुरू असल्याचे यापूर्वी समोर आले आहे.

beed news
Beed News : आरोपीच्या अटकेसाठी आठ दिवसांचा अल्टीमेटम

'समाजबांधव' म्हणून एकत्र येण्याचे आवाहन करणारा हा बॅनर केवळ महादेव मुंडेंच्या कुटुंबाचा आक्रोश नसून, न्यायासाठी समाजाची भूमिका काय असावी, याचा आरसा ठरत आहे. त्यामुळे या बॅनरमागील भावना आणि त्यातून उपस्थित झालेल्या सवालावर आता परळीकर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news