

Mahadev Munde murder case We didn't even know Mahadev Munde; Sushil Karad claims
बीड पुढारी वृत्तसेवा : महादेव मुंडे प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उडालेल्या खळबळीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात अप्रत्यक्षपणे नामोल्लेख झालेल्या सुशील कराड यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने मोठा गौप्यस्फोट करत या प्रकरणाशी स्वतःचा व कुटुंबाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. महादेव मुंडे यांना माझे वडील, मी किंवा माझा भाऊ कोणीही ओळखत नव्हते. अशा शब्दांत वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराडने सर्व आरोप फेटाळले आहेत.
महादेव मुंडे खून प्रकरणात सत्य काय आहे, हे जनतेसमोर यावे, यासाठी सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी स्पष्ट व ठाम मागणी कराड कुटुंबाकडून करण्यात आली आहे. कोणी डखढ किंवा उखऊचौकशीची मागणी करत असेल, तर आम्ही त्याहून वर जाऊन थेट सीबीआय चौकशीची मागणी करतो. कारण यातून जे सत्य आहे ते समोर यावे आणि खोटे दावे करणाऱ्यांचे बुरखे फाटले पाहिजेत, असे सुशील कराड यांनी म्हटले आहे.
तसेच, एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल २० महिन्यांनी अचानक आमच्यावर बोट ठेवले जाते. यात नेमका उद्देश काय आहे? सत्य का दाबले जात आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर कराड कुटुंब लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर भूमिका मांडणार असल्याची माहिती त्यांनी दिली. माझ्या वडिलांचा, माझा किंवा माझ्या भावाचा महादेव मुंडे यांच्याशी कधीही संबंध आला नाही.
मग अशा व्यक्तीला मारण्यासाठी आम्ही का जाऊ ? ही सगळी बनावट कथा असून, यामागे कोणीतरी मोठं षडयंत्र रचत आहे. त्याचा हेतू स्पष्ट आहे तो म्हणजे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करणे. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे, असा आरोप कराड याने यावेळी केला. माझ्या भावावर असा आरोप करण्यात येतो की तो देशाबाहेर पळून जाणार होता. पण सत्य हे आहे की आमच्याकडे पासपोर्ट नाही. जर त्याला पळून जायचं असतं, तर तो कधीच गेला असता. तो सध्या न्यायालयीन मागनि डिस्चार्ज अर्जासाठी प्रयत्न करत आहे. हे सर्व काही कायद्याच्या चौकटीतच होत आहे, मात्र खोट्या बातम्या पेरून दिशाभूल केली जात आहे.