

गौतम बचुटे
केज : शेतातील नंबर बांधाच्या रस्त्याच्या कारणा वरून झालेल्या भांडणात एकाने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली आहे. केज तालुक्यातील लव्हुरी येथील संदिप अच्युत चाळक दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८:०० वा. सुमारास घरा समोर उभे असतांना ऋषीकेश वसंत चाळक सोबत कृष्णा शिवाजी चाळक, मुन्ना महादेव चाळक, प्रकाश रामभाऊ चाळक हे सर्वे नं १९० व १९१ मधील नंबर बांधाच्या रस्त्या वरुन पिकअप घेवुन जात असतांना म्हणाले की, हा कोणाच्या बापाचा रस्ता नाही ? असे म्हणुन निघुन गेला. त्यानंतर संदीप चाळक यांनी त्याचे वडिल वसंत सखाराम चाळक यास फोन करुन ही माहिती दिली आणि त्याला समजावुन सांगा असे सांगितले.
त्यानंतर ऋषीकेश चाळक, कृष्णा शिवाजी चाळक, मुन्ना महादेव चाळक, प्रकाश रामभाऊ चाळक हे मोटारसायकली वरून संदीप चाळक यांच्या घराकडे गेले. त्यांनी त्यांच्या वडीलांना फोन का करुन सांगितलेस ? असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण केली. त्यावेळी संदीप चाळक यांची आई भांडण सोडवत असताना ऋषीकेशने आईला त्यांना पोटात कमरेत लाथ मारून शिवीगाळ करुन जिव मारण्याच्या धमक्या दिल्या.
या भांडणात ऋषीकेश चाळक याने संदीप चाळक यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावुन घेवुन गेला. संदीप चाळक यांच्या तक्रारी वरून ऋषीकेश चाळक, कृष्णा चाळक, महादेव चाळक आणि प्रकाश चाळक (सर्व रा. लव्हुरी ता केज) यांच्या विरुद्ध केज.पोलिस ठाण्यात. गु. र. नं. ५५१/२०२५ भा. न्या. सं. ११५(२), ११९(१), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक सोनवणे हे तपास करीत आहेत.