

गौतम बचुटे
केज : केज शहरात मुख्य रस्त्या लगत पत्र्याच्या शेडमध्ये चालत असलेल्या जुगार अड्यावर केज पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने छापा मारून तिर्रट खेळणाऱ्या १२ जणांना पकडले. त्यांच्या कडील जुगाराचे साहित्य, नगदी १७ हजार ३५० रुपये, एक लाख ७३ हजार रुपयांचे आठ मोबाईल व चार लाख ४५ हजार रुपयांच्या सहा दुचाकी असा ६ लाख ३५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
केज शहरात मुख्य रस्त्यावर जिरायत खात्याच्या जागेवर पत्र्याच्या शेडमध्ये काही जण तिर्रट नावाचा जुगार पैशावर खेळत असल्याची गुप्त माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलिस उपनिरिक्षक अमिरोद्दीन इनामदार, जमादार बाळासाहेब अहंकारे, पोलीस नाईक पुरुषोत्तम शेप, प्रकाश मुंडे, शिवाजी कागदे यांच्या पथकाने सोमवार दि. ६ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजता छापा मारला.
यावेळी अनिल कमलाकर काळे, सुरेश बाळू काळे, नेहाल अशोक कांबळे ( तिघे रा. क्रांतीनगर, केज), शंकर अंकुश पवार (रा. वडारवस्ती ता. केज), बाळु अर्जुन गाढवे (रा. अहिल्यादेवी नगर, केज), अशोक बाळासाहेब शिंदे (रा. विठ्ठलनगर, केज), सचिन कविदास पवार, कृष्णा शहाजी कोठुळे (दोघे रा. बोबडेवाडी ता. केज), दिलीप फुलचंद पवार (रा. चिंचपुर ता. धारुर), मनोज अण्णासाहेब मस्के (रा. फुलेनगर,केज), मयुर भिमराव गायकवाड (रा. शिक्षक कॉलनी, केज) या १२ जणांना तिर्रट खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्या कडील जुगाराचे साहित्य, नगदी १७ हजार ३५० रुपये, एक लाख ७३ हजार रुपयांचे आठ मोबाईल व चार लाख ४५ हजार रुपयांच्या सहा दुचाकी असा ६ लाख ३५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फौजदार अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादीवरून वरील बारा जणां विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ५५०/२०२५, भारतीय जुगार कायद्याचे कलम १२(ए) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार दत्तात्रय बिक्कड हे करीत आहेत.