

गौतम बचुटे
केज : केज तालुक्यातील एकुरका येथे अवैधरित्या दारूची विक्री सुरू असलेल्या ठिकाणी पोलिसांची छापा टाकून मुद्देमालासह दारू विक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एकरुका येथे एक महिला अवैधरित्या दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच दि. १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षिरसागर आणि त्यांच्या पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव, हेड कॉन्स्टेबल राजू वंजारे, पोलिस कॉन्स्टेबल रशीद शेख, पोलिस कॉन्स्टेबल पाशा शेख, महिला पोलिस कॉन्स्टेबल पूजा माके यांनी धाड टाकली.
पोलिस पथकाने चोरटी व अवैद्य दारू विक्री करीत अडलेली महिला नसरीन नादान शेख हिला बॉबी संत्रा दारूच्या २३ बाटल्यासह ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस हेडकॉस्टेबल राजू वंजारे यांच्या तक्रारीवरून नसरीन नादान शेख या महिलेविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६४३/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाचे कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव हे तपास करीत आहेत.