Kej Cow Rescue | केजमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय प्राण्यांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा

Kej Cow Rescue | केज शहरात गोवंशीय प्राण्यांच्या अवैध कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ जनावरांची पोलिसांनी धडक कारवाई करत सुटका केली आहे.
Kej Cow Rescue | केजमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय प्राण्यांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा
Published on
Updated on
Summary
  1. केज येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय प्राण्यांची पोलिसांनी सुटका केली

  2. सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या पथकाची धडक कारवाई

  3. दोन आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  4. जप्त प्राण्यांची किंमत १ लाख ६३ हजार रुपये

  5. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला

केज शहरात गोवंशीय प्राण्यांच्या अवैध कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ जनावरांची पोलिसांनी धडक कारवाई करत सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Kej Cow Rescue | केजमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय प्राण्यांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा
Nrusinhwadi Datta Temple | अधिक मासानिमित्त नृसिंहवाडीत एक हजार महिलांकडून विष्णू सहस्त्रनाम पठण; दत्त मंदिर परिसर भक्तिमय वातावरण

मिळालेल्या माहितीनुसार, २७ मे रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम (IPS) यांना गोपनीय माहिती मिळाली होती. केज शहरातील एका शेतामध्ये गोवंशीय जातीचे काही प्राणी कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी तातडीने विशेष पथकाला कारवाईचे आदेश दिले.

आदेश मिळताच पोलिस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलिस हवालदार बालासाहेब डापकर, धोंडीराम मोरे, राजू वंजारे, विशाल क्षीरसागर आणि विकास चोपणे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी धडक छापा टाकला. पोलिसांनी शेत परिसराची तपासणी केली असता तेथे बैल, गाय आणि गोऱ्हे अशा गोवंशीय जातीचे एकूण आठ प्राणी बांधून ठेवलेले आढळून आले. तपासादरम्यान हे प्राणी कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला.

जप्त करण्यात आलेल्या या प्राण्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख ६३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने या सर्व जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले.

या प्रकरणी भागवत बारीकराव पारवे (रा. केज) आणि नौशाद उस्मान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज) यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार राजू वंजारे यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Kej Cow Rescue | केजमध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय प्राण्यांची सुटका; दोघांविरुद्ध गुन्हा
India Population Trends | दक्षिण भारत वृद्धत्वाकडे, हिंदी पट्टा लोकसंख्या स्फोटाच्या छायेत!

दरम्यान, जिल्ह्यात अवैध कत्तल आणि गोवंशीय प्राण्यांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. या कारवाईमुळे अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिसांच्या विशेष पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने ही मोहीम यशस्वी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news