Beed News : कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला

परळी तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण
Beed News
Beed News : कासारवाडीचा 'बोरणा' तलाव १०० टक्के भरला File Photo
Published on
Updated on

Kasarwadi's 'Borana' lake filled to 100 percent

परळी, पुढारी वृत्तसेवा : परळी तालुक्यातील कासारवाडी येथील 'बोरणा' मध्यम प्रकल्प १०० टक्के भरला आहे. तालुक्यातील जलसाठे भरत असल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. परळी चा मुख्य जलस्रोत असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात यापूर्वीच १०० पाण्याचा साठा झालेला आहे व सद्यस्थितीत पाण्याचा मोठा ओघ सुरू आहे.

Beed News
पोलिसांना पाहून वेगात गाडी पळवल्याने अपघात; अपघातग्रस्त गाडीत सापडला एकवीस लाखांचा गांजा

परळी तालुक्यात चांगला पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र पाणी साठवण होण्यासाठी मोठी मदत होत आहे. परळी तालुक्याचा मुख्य जलस्त्रोत नागापूर येथील 'वाण प्रकल्प' पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. तालुक्यातील बोधेगाव, करेवाडी, चांदापूर, कन्हेरवाडी, गुट्टेवाडी, मोहा, मालेवाडी, गोपाळपूर, खोडवा सावरगाव, दैठणाघाट, करेवाडी आदींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण होण्यास सुरुवात झाली आहे.

बोरणा तलावाच्या सांडव्यावरून पाणी प्रवाहित दरम्यान परळीपासून जवळच असलेल्या कासारवाडी येथील बोरणा तलावात १०० टक्के. पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या बोरणा प्रकल्पाची प्रकल्पिय पाणीसाठा क्षमता १०. ८१४द. ल. घ. मी. एवढी आहे.

Beed News
Beed Pudhari : शेळ्या चारण्यावरून हाणामारी; एकाचा मृत्यू

मृतसाठा १.८४२ द. ल. घ. मी. इतका असून सद्यस्थितीत बोरणा प्रकल्पात सांडव्यावरुन पाणी प्रवाहित झाले आहे. तालुक्यातील नागापूर वाण, बोधेगाव, करेवाडी, कन्हेरवाडी, मालेवाडी, तांदुळवाडी, मोहा, चांदापूर, गुट्टेवाडी, खोडवा सावरगाव, दैठणाघाट आदींसह पाझर तलाव, बंधारे, नद्या, ओढे, विहिरी पूर्ण क्षमतेने भरली जात आहेत. जलसाठे संपूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत असल्याने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news