Junior Maharashtra Kesari | 'जुनिअर महाराष्ट्र केसरी'चा मान बीडला; गादी विभागात सुमितकुमार भारस्करने सुवर्णपदक पटकावले

Sumitkumar Bharskar Beed | सुमितकुमारची ७० किलो वजन गटातील गादी विभागात शानदार कामगिरी
Junior Maharashtra Kesari | 'जुनिअर महाराष्ट्र केसरी'चा मान बीडला;  गादी विभागात सुमितकुमार भारस्करने सुवर्णपदक पटकावले
Pudhari
Published on
Updated on

Maharashtra wrestling gold medal

माजलगाव : तालुक्यातील शेलापुरी या पुनर्वसित गावातील ऊसतोड कामगाराचा मुलगा पै. सुमितकुमार आप्पासाहेब भारस्कर याने महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ७० किलो वजन गटातील गादी विभागात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या विजयासह तो या गटातील महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला असून, बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे १८ ते २२ मार्च २०२६ दरम्यान झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुमितकुमारने सुरुवातीपासूनच दमदार खेळ दाखवला. पहिल्या चार फेऱ्यांमध्ये त्याने प्रतिस्पर्ध्यांवर १०-० अशा मोठ्या फरकाने मात केली. उपांत्य फेरीत पुणे शहराच्या विपुल थोरात याच्यावर ८-५ अशी झुंज देत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

Junior Maharashtra Kesari | 'जुनिअर महाराष्ट्र केसरी'चा मान बीडला;  गादी विभागात सुमितकुमार भारस्करने सुवर्णपदक पटकावले
Beed News : परळी तालुक्यात छळाला कंटाळून मजुराने जीवन संपवले

अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सत्तपा हिरगुडे याच्यावर ६-० अशा एकतर्फी विजयासह सुमितकुमारने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. सध्या सुमितकुमार पुण्यातील मारुंजी येथील अमोल बुचडे कुस्ती अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असून, त्याला रुस्तम-ए-हिंद तथा महाराष्ट्र केसरी पै. अमोल भाऊ बुचडे, नरेंद्र कुमार, घुले सर, पै. समीर देसाई, गुंड आणि कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या यशामुळे माजलगावसह संपूर्ण बीड जिल्ह्याचा दबदबा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अधोरेखित झाला असून, सुमितकुमार भारस्कर याच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news