Marigold Cultivation : अवघ्या पाच महिन्यांत झेंडू लागवडीतून अठरा लाखांचे उत्पन्न

ड्रायव्हर ते प्रयोगशील प्रगत शेतकरी असा शेख अतिक यांचा प्रवास
Marigold Cultivation
Marigold Cultivation : अवघ्या पाच महिन्यांत झेंडू लागवडीतून अठरा लाखांचे उत्पन्नFile Photo
Published on
Updated on

Income of 18 lakhs from marigold cultivation in just five months

केज, पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षण नसल्यामुळे जीप वर क्लिनर म्हणून काम करणारा युवक पुढे जीप ड्रायव्हर बनला त्या नंतर मात्र त्याने ड्रायव्हिंग सोडून देऊन चक्क एका प्रयोगशील आधुनिक शेतकरी म्हणून झेंडूच्या लागवडीतून एकरी सहा लाखाचे उत्पन्न काढले आहे.

Marigold Cultivation
School News : रस्त्याअभावी शाळा लिंबाच्या झाडाखाली

बीड जिल्ह्यातील साळेगाव तालुका केज येथील अतिक शेख हा सामान्य कुटुंबातील तरुण. शिक्षण नसल्यामुळे किमान ड्रायव्हिंग शिकण्यासाठी अतिक शेख याने एका जीप वर काही काळ क्लिनर म्हणून काम केले त्या नंतर काही काळ ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हिंग देखील केली. मात्र त्या नंतर त्यांनी वडिलोपार्जित शेतीत आधुनिक पद्धतीने शेती सुरू केली. या वर्षी आतिक शेख यांनी तीन एकर क्षेत्रावर ३० हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली.

दोन महिन्या नंतर झेंडूची तोडणी सुरू झाली आहे. दिवाळी नंतर आता लग्नसराई सुरू झाली असल्याने झेंडूच्या फुलाला बाजारात चांगली मागणी आहे. तर अतिक शेख यांच्या झेंडूला कल्याणच्या मार्केट मध्ये ८० हजार रु. प्रति टन असा भाव मिळत आहे. त्यांना एकरी ६ ते ७ टन माल निघत असून पहिल्या तोडणी पासून सुमारे दोन ते अडीच महिने फुलांची तोडणी करता येते. तसेच आणखी बाजारभाव वाढण्याची शक्यता असून हिवाळ्यात झेंडूवर कीड आणि रोगराईचा कमी प्रादुर्भाव जाणवतो. पावसाळ्यात मात्र फुले तोडण्याच्या काळात पाऊस पडल्यास फुले साधण्याची जास्त भिती असते.

Marigold Cultivation
Beed Crime News : लाचलुचपत विभागाच्या कार्यवाहीने खळबळ अभियंत्यास एसीबीने पकडले !

या झेंडू लागवडीतून आता शेख अतिक यांना एकरी सहा लाखा पेक्षा जास्त म्हणजे त्यांच्या तीन एकर जमिनीत १८ ते २० लाखाचे उत्पन्न मिळणार असून त्यांचा लागवाडीपूर्व लागवडी नंतर खते, फवारणी, मजूर यासह आंतर मशागतीचा खर्च ३ ते ३.५० लाख रुपये वजा जाता पंधरा ते सतरा लाख रु. निव्वळ नफा मिळणार आहे. खर्च: कलम ९० हजार रुपये, मल्चिंग १ लाख ५० हजार रुपये, खत व फवारणी ५० हजार रुपये, मजूर व अंतर मशागत ५० हजार रुपये, इतर खर्च १० हजार रुपये एकूण खर्च ३ लाख ५० हजार

मी वेगवेगळे प्रयोग करून शेती करीत असताना माझ्या सोबतच मी माझ्या अनेक शेतकरी मित्रांना ढोबळी मिरची, टमाटे, खरबूज, झेंडू, कांदा लागवड याची माहिती देऊन मार्गदर्शन करीत असतो. सर्वांना सोबत घेऊन शेती केल्यास एकमेकांचे उत्पन्न वाढते पण एकमेकांना मदत सुद्धा होते अशी माहिती शेतकरी अतिक शेख यांनी सांगितले.

शेजाऱ्यांनी आधुनिक पद्धतीने आणि नवनवीन तंत्रज्ञान यासह तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आणि बाजारचा अभ्यास करून शेती करायला हवी. तर चांगले उत्पन्न मिळण्याची शाश्वती जास्त असते असे सहाय्यक कृषी अधिकारी कमलाकर राऊत यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news