

Action taken by the anti-corruption department, ACB arrests the engineer!
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई पंचायत समिती कार्यालयातील अभियंत्याने एका शेतकऱ्यांकडे गायगोठ्याची फाईल करण्यासाठी एएक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शनिवारी त्या अभियंत्याच्या मुसक्या बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आवळल्या आहेत. विनायक राठोड असे मुसक्या आवळलेल्या लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
विनायक राठोड ह्याने १९ नोव्हेंबर रोजी एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी त्याच्या बीड शहरातील अंबिका चौकातील एका प्रायव्हेट कार्यालयात केली होती. संबंधीत तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीने त्याच्याविरोधात सापळा लावला. परंतु राठोडला संशय आल्यानंतर त्यानं तक्रारदाराला टाळायला सुरूवात केली. मात्र लाचेची मागणी केल्यावरून विनायक राठोड यास बीड एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.
ही कारवाई बीडचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांनी ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईमुळे तरी शेतकऱ्यांच्या कामांना गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.