Dharur Ghat Accident : धारूर घाटात ट्रक-कारचा भीषण अपघात

दोन्ही वाहने दरीत कोसळली; सहा जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक
Dharur Ghat Accident
Dharur Ghat Accident : धारूर घाटात ट्रक-कारचा भीषण अपघातfile photo
Published on
Updated on

Horrific Truck-Car Accident in Dharur Ghat

धारूर, पुढारी वृत्तसेवा: धारूर घाटातील अपघातांची मालिका सुरूच असून १८ मार्च बुधवार रोजी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. घाटातील धोकादायक वळणाचा अचूक अंदाज न आल्याने ट्रकचालकाचा ताबा सुटला. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला कठड्याजवळ उभ्या असलेल्या स्विफ्ट कारला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही वाहने सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ६ जन जखमी झाले आहेत.

Dharur Ghat Accident
Dharur Ghat tanker accident : धारूर घाटात ब्रेक फेल; टँकर 300 फूट दरीत कोसळला

या अपघातात ट्रक व स्विफ्ट कारमधील मिळून सहा जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली. धारूर शहराच्या पायथ्याशी सुमारे तीन किलोमीटरचा हा घाट अरुंद व नागमोडी वळणांचा आहे. या घाटात आजवर शेकडो अपघात होऊन ५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. मागील आठ दिवसांतच या घाटात सहा अपघात घडले असून २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

१८ मार्च बुधवार रोजी सायंकाळी साखर वाहतूक करणारा ट्रक घाटातून जात असताना चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने ट्रकवरील ताबा सुटला. त्याच ठिकाणी उभी असलेल्या स्विफ्ट कारला धडक बसताच दोन्ही वाहने दरीत को-सळली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. पोलिस व आपत्कालीन पथकानेही घटनास्थळी पोहोचून जखमींना बाहेर काढले व तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, धारूर घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर ठोस सुरक्षात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Dharur Ghat Accident
Beed Accident : सिमेंटची पोती घेऊन जाणारा ट्रक पलटी

अपघात होताच प्रशासन सतर्क

सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून, घटनेची माहिती मिळताच आयपीएस व्यंकटरमन, तहसीलदार श्रीकांत निळे, तसेच सहायक पोलिस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news