Shahagad stray dog attack : शहागड येथील अकरा वर्षांच्या चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याचा हल्ला

चिमुकला गंभीर जखमी; थरारक घटना ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यात कैद
Shahagad stray dog attack
Shahagad stray dog attackpudhari photo
Published on
Updated on

शहागड : येथे घरासमोर खेळत असलेल्या ११ वर्षीय चिमुकल्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवार, दि. १० रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मोहम्मद अली मुकद्दीर शेख हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

शहागड येथील जामा मस्जिद परिसरातील घरासमोर मोहम्मद अली हा खेळत होता. यावेळी त्याच्यावर अचानक मोकाट कुत्र्याने त्याच्यावर हल्लका केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्याचा गालाचा कुत्र्याने लचका तोडला आहे. चिमुकल्याने कुत्र्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढला.

Shahagad stray dog attack
Jalna dowry case : एक लाखाच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत त्या कुत्र्याला तेथून हुसकावून लावले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी दवाखान्यात हलवण्यात आले‌. दरम्यान, सध्या गंभीर जखमी चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

ही घटना वाऱ्यासारखी शहागडसह परिसरात पसरल्यानंतर पालक व आई-वडिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर शहागड परिसरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Shahagad stray dog attack
Sillod food safety action : सिल्लोड बसस्थानकावरील उपाहारगृहाचा परवाना निलंबित

बंदोबस्त करा : राऊत

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याच्या गालाचा लचका तोडला गेला आहे. ही बाब गंभीर असून तत्काळ या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा विभागप्रमुख राजेश राऊत यांनी दिलेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news