Beed Accident : टिप्परच्या धडकेत आजोबा-नातीचा मृत्यू

बीड परळी रोडवर पांगरी गावाजवळ एका भरधाव वेगातील टिप्परने दुचाकीला धडक दिली. यामध्ये आजोबासह नातीचा जागीच मृत्यू झाला
Beed Accident
Beed Accident : टिप्परच्या धडकेत आजोबा-नातीचा मृत्यू File Photo
Published on
Updated on

Grandfather and granddaughter die in tipper accident

परळी, पुढारी वृत्तसेवा : बीड परळी रोडवर पांगरी गावाजवळ एका भरधाव वेगातील टिप्परने दुचाकीला धडक दिली. यामध्ये आजोबासह नातीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.

Beed Accident
Beed Crime : पती-पत्नीत वाद; पतीने घेतला गळफास, तीन वर्षांची अक्षरा बेपत्ता

वसंत ताराचंद चव्हाण (५५, रा. जवळगव्हाण) व श्रुती विजय चव्हाण (८) असे अपघातात ठार झालेल्या आजोबा-नातीची नावे आहेत. जवळगव्हाण येथील सरपंच वसंत चव्हाण यांची नात श्रुती ही आजारी होती. त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन गेले होते. तेथून परत गावाकडे जात असताना त्यांची दुचाकी पांगरी गावाजवळ आली असता भरधाव वेगातील टिप्परने त्यांना जोराची धडक दिली. यात वसंत चव्हाण व श्रुती चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत अस-लेली महिला गंभीर जखमी झाली. परिसरातील लोकांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Beed Accident
Beed Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले

बीड-परळी मार्गावर पुलाचे पांगरी गावानजीक पुलाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे या परिसरात अनेक अपघात घडलेले आहेत. बुधवारी सायंकाळी झालेल्या अपघाताला जबाबदार असलेले टिप्पर देखील यश कन्स्ट्रक्शनच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. या पुलाच्या कामाच्या ठिकाणीही अपघात झाले असून या सर्व घटनांना संबंधित कंत्राटदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news