illegal sand mining : अवैध वाळू उपसा करताना तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

गेवराई तालुक्यातील घटना; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळूमाफिया मोकाट
illegal sand mining
अवैध वाळू उपसा करताना तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यूpudhari photo
Published on
Updated on

टाकरवण : गेवराई तालुक्यातील तपेनीमगाव येथील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपशाच्या केणीवर कामासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची रविवारी घडली. सोमवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध वाळू उपशाच्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सतीश किसन भोंगदळ (वय ३५, रा. टाकरवन, ता. माजलगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास सतीश भोंगदळ हा तपेनीमगाव येथील गोदावरी नदीपात्रात वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या केणीवर कामासाठी गेला होता. दोरखंडाला केंग बांधण्यासाठी तो नदीपात्रात उतरला असताना अचानक तो बेपत्ता झाला. ही माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली.

illegal sand mining
Pune News : खेळताना काळाची झडप! पाझर तलावात बुडून सख्ख्या जुळ्या बहीण-भावाचा मृत्यू, ओतूरवर शोककळा

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी नदीकाठाकडे धाव घेतली. नदीकाठावर सतीश याचे कपडे व मोबाईल आढळून आल्याने तो पाण्यात बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यानंतर तलवाडा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सोमवारी सकाळपासून गोदावरी नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. स्थानिक मच्छीमार, ग्रामस्थ, अग्निशमन दलाचे पथक तसेच प्रशासनाच्या मदतीने शोधकार्य सुरू होते.

अखेर सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सतीश भोंगदळ याचा मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून जातेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

illegal sand mining
Beed Crime | माजलगाव : सिंदफणा नदीपात्रात महिलेचा सांगाडा आढळल्याने खळबळ

या घटनेमुळे टाकरवन परिसरात शोककळा पसरली असून अवैध वाळू उपशामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news