Beed News : नरेगा कामांच्या चौकशीसाठी पंचायत समितीच्या इमारतीवर चढून आंदोलन

गेवराई : अनियमिततेचा आरोप; चौकशीच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे
MGNREGA Scam
नरेगा कामांच्या चौकशीसाठी पंचायत समितीच्या इमारतीवर चढून आंदोलनpudhari photo
Published on
Updated on

गेवराई : तालुक्यातील पाथरवाला बु. येथील नरेगाअंतर्गत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ गोवर्धन मस्के यांनी सोमवारी गेवराई पंचायत समिती कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. या प्रकारामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

गोवर्धन मस्के यांनी नरेगा योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

MGNREGA Scam
Sangli News : खराब रस्त्यामुळे मृत्यू झाल्यास 6 लाखांची भरपाई

घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गटविकास अधिकाऱ्यांनी मस्के यांच्याशी चर्चा करून त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यात येईल आणि नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेत इमारतीवरून सुरक्षितपणे खाली उतरले.या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही.

दरम्यान, या आंदोलनामुळे पाथरवाला बु. येथील नरेगा कामांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रशासनाने चौकशीचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात चौकशी कितपत निष्पक्ष होते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

MGNREGA Scam
Uran Oil Tanker Accident: जेएनपीए पोर्ट रोडवर प्रशासनाचा निष्काळजीपणा; ऑईल टँकर पलटी, हजारो लिटर तेलाची नासाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news