

Gayran land dispute attacked on Family beed
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : तुम्ही गायरान जमिन वहिती करायची नाही या कारणावरून चौघांनी एका आदिवासी कुटूंबातील तिघांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना बगेवाडी येथे घडली. या हल्यामध्ये वडिलांसह माय-लेकी देखील गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुरुवारी रात्री तलवाडा पोलिस ठाण्यात चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
तलवाडा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील बगेवाडी येथील गंगूबाई गंगा भोसले या अंतरवाली बुद्रुक येथील गट क्र. ३१४ व १४४ या दोन्ही गटांतील गायरान जमिन वहिती (कसत) होत्या. चार दिवसांपूर्वी सायंकाळी गंगुबाई भोसले घरासमोर असताना त्याठिकाणी आलेल्या चौघांनी गायरान जमिन वहिती (कसायची) नाही, तुमचे घर सुध्दा मोडून टाकायचे आहे. असे म्हणून गंगूबाई हिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला.
जवळच असणारे त्यांच्या आई लक्ष्मी बाजीराव काळे आणि वडिल बाज- ीराव रामभाऊ काळे हे दोघेही सोडवण्यासाठी आले असता दीपक वावरे याने हातातील कुन्हाडीच्या दांड्याने बाजीराव काळे यांना मारहाण केली. एवढ्यावर न थांबता शिवीगाळ करून धमक्या दिल्या. या मारहाणीत बाजीराव काळे यांच्या पाठीवर, पायावर व डाव्या डोळ्यावर मार लागला आहे. तर लक्ष्मी काळे यांच्या हातावर व गालावर दुखापत झाली आहे. तसेच गंगुबाई भोसले यांच्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली आहे.