Beed News : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा गेवराई दौरा

रेशीम शेती, रोहयो कामांचा आढावा; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद
Beed News
Beed News : जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा गेवराई दौराFile Photo
Published on
Updated on

District Collector Vivek Johnson's visit to Gevrai

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवारी (२ जुलै) गेवराई तालुक्यातील रुई, सिसरदेवी आणि गढी परिसराला भेट देत विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. रेशीम शेती प्रकल्प, रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेली कामे, तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या भौतिक सुविधांची पाहणी करताना त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

Beed News
Beed News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरूणाला अटक

रुई येथील ग्रामपंचायत कार्यालयास भेट देत रेशीम शेतीचे प्रात्यक्षिक व उत्पादनाचे स्वरूप पाहिले. यावेळी त्यांनी शाश्वत शेती आणि उत्पन्न वाढीच्या दृष्टीने रेशीम शेती महत्वाची भूमिका बजावू शकते, असे प्रतिपादन केले. रोहयो योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची तपासणी करताना त्यांनी कामाच्या गुणवत्तेची आणि वेळेत पूर्णतेची खातरजमा केली.

यानंतर त्यांनी सिरसदेवी ग्रामपंचायतीच्या प्रगतीचा आढावा घेत तेथील स्थानिक पातळीवरील अंमलबजावणी तपासली. योजनेची यावेळी गटविकास अधिकारी मीना कांबळे, तहसीलदार संदीप खोमणे, अभियंते संजीवकुमार चोपडे, मंगेश लोणकर, जगताप, एपीओ गणेश जोगदंड, तसेच रुईचे सरपंच कालिदास नवले व सिसरदेवीचे सरपंच रवींद्र गाडे यांच्यासह अनेक अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Beed News
Beed Crime News : बीड जिल्ह्यात सहा महिन्यांत पंधरा खून

दौऱ्यानंतर गढी येथील जवाहर नवोदय विद्यालय व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट देत, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या भौतिक सोयी-सुविधांची पाहणी केली. यानंतर गेवराई तहसील कार्यालयात सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रशासनातील अडचणी, नागरिकांच्या तक्रारी आणि उपाययोजना यावर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, थेट संवादातून प्रश्न सोडवण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीचे स्वागत होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news