Success Story | जिद्द, मेहनत, संघर्षाला यशाची सलामी; गौशिया शेखची मुंबई पोलीस दलात निवड

या यशामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण शहरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण
Ambajogai Girl Selected In Mumbai Police
Ambajogai Girl Selected In Mumbai Police Pudhari
Published on
Updated on

Ambajogai Girl Selected In Mumbai Police

अंबाजोगाई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अथक परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अंबाजोगाई येथील गौशिया सादेक शेख यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची महाराष्ट्र पोलीस मुंबई दलात निवड झाली आहे. या यशामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण शहरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गरीब कुटुंबातील गौशिया हिला लहानपणापासूनच पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आर्थिक अडचणी, विविध आव्हाने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आणि शारीरिक तयारी सातत्याने सुरू ठेवली. कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी अखेर आपल्या स्वप्नाला यशस्वी वास्तवात उतरवले.

Ambajogai Girl Selected In Mumbai Police
Beed Agriculture News : अर्धा जून महिना संपला, पाऊस बेपत्ता!

गौशिया हिच्या या यशामागे अथक मेहनत, ध्येयाप्रती असलेली निष्ठा तसेच कुटुंबीयांचा मिळालेला भक्कम पाठिंबा महत्त्वाचा ठरला. निवडीमुळे शेख कुटुंबाच्या आनंदात भर पडली असून समाजातील अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणास्थान बनली आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक अडचणींना सामोरे जात असलेल्या युवकांसमोर गौशियाने एक आदर्श निर्माण केला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण प्रयत्न केले. तर यश निश्चित मिळते, हे आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवले आहे.

Ambajogai Girl Selected In Mumbai Police
Beed News : आईचे स्वप्न, मुलाची दानत अन् गावाच्या भवितव्याला नवी दिशा!

"मेहनतीला यशाची जोड मिळते," हा संदेश यशातून अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गौशिया सादेक शेखवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news