बनावट नोटा प्रकरणात चौदा ठिकाणी छापेमारी; एकास अटक, घातक शस्त्र जप्त

बनावट नोटा प्रकरणात चौदा ठिकाणी छापेमारी; एकास अटक
Beed news
बनावट नोटा प्रकरणात चौदा ठिकाणी छापेमारी; एकास अटक pudhari news
Published on
Updated on

बीड : बीडमध्ये आढळून आलेल्या बनावट नोटांच्या प्रकरणात पोलिस दलाने गुरुवारी चौदा ठिकाणी छापेमारी केली. यात आरोपीच्या घरुन घातक शस्त्र जप्त करण्यात आले असून या बनावट नोटांचे कनेक्शन परराज्यातही असल्याचे समोर आले आहे. याची पाळेमुळे शोधण्यासाठी एक पथक परराज्यातही पाठवण्यात आले आहे.

बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी सनी आठवले, महेश आठवले व मनेश क्षीरसागर यांच्या घरासह इतर चौदा ठिकाणी बीड पोलिसांच्या विविध पथकाने एकाच वेळी छापेमारी केली.

यात पोलिसांना घातक शस्त्र आढळून आले आहेत. या प्रकरणात महेश आठवले यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या बनावट नोटा प्रकरणाचे कनेक्शन परराज्यातही असल्याचा संशय बीड पोलिसांना असून त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी बनावट नोटा जप्त होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आणि यात सर्वाधिक म्हणजे, ८७ टक्के बनावट नोटा या ५०० आणि २००० रुपये मूल्याच्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या एका आर्थिक अहवालातून हे पुढे आले आहे.

अनेकदा अजाणतेपणाने आ पणही या बनावट नोटांमध्ये व्यवहार करत असतो. कारण, एकतर आपण वेळे अभावी नोट निरखून बघत नाही. आणि अनेकदा बनावट नोट ओळखायची कशी हे आपल्याला माहीत नसते.

रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर बनावट नोट म्हणजे काय इथपासून ते ती कशी ओळखायची याविषयीची सर्व माहिती सविस्तर देण्यात आलेली आहे. तरीही ही माहिती कोणी वाचत नाही. साधी चौकशीही करीत नाहीत. वेबसाईटवर 'अर्थविषयक जागृती' या सदरात जर आपण गेलो तर 'तुमची नोट ओळखा', या मथळ्याखाली १० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत सर्व नोटांचे रंग, माहिती, आकार आणि सुरक्षा विषयक निकष दिलेले आहेत. याकडेही आपण दुर्लक्ष करतो.

Beed news
परभणी : बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी मानवतला एकास अटक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news