परभणी : बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी मानवतला एकास अटक

परभणी : बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी मानवतला एकास अटक
Published on
Updated on

मानवत; पुढारी वृत्तसेवा : मानवत येथे भारतीय चलनातील दोनशे रुपया सारख्या बनावट नोटा तयार करून त्या नोटांचा चलनात वापर केल्याप्रकरणी १९ वर्षीय युवकास अटक करण्यात आली आहे. मानवत शहरातील खंडोबा रोडवरील  युवकास मंगळवारी (ता १४) नोटा बनवण्याच्या साहित्यासह पोलिसांनी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल संतोष खरात (वय १९) असे या युवकाचे नाव आहे. तो त्याच्या राहत्या घरी लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने भारतीय चलनाच्या २०० रुपये चलनाच्या बनावट नोटा कलर प्रिंटरने बनवत होता. याबाबत स्थानिक गुन्हा शाखा परभणीच्या पथकाला माहिती मिळाली होती. पोलिसांनी आरोपीच्या घरातून कलर प्रिंटर , २०० रुपयाच्या बनावट नोटा , पेपर व अन्य साहित्य जप्त करून सदरील तरुणास अटक केली.

याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस नायक दिलावर खान रशीद खान पठाण यांचे फिर्यादिवरून विशाल खरात विरुद्ध रात्री ९ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश स्वामी करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news