Kaij Kidnapping Case | केज तालुक्यात सालगड्याच्या २१ वर्षीय मुलीचे अपहरण

अज्ञात व्यक्तीविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू
 kidnapping cases
kidnapping casesPudhari
Published on: 
Updated on: 

Farm Labourer Daughter Kidnapped

केज : केज तालुक्यात शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या एका कुटुंबातील २१ वर्षीय अविवाहित मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एक कुटुंब मागील तीन महिन्यांपासून केज तालुक्यात महादू गायकवाड यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत आहे. या कुटुंबात सालगडी, त्यांची पत्नी, सून, लहान मुलगा आणि मुलगी यांचा समावेश आहे.

 kidnapping cases
Kaij Accident | केज-अंबाजोगाई रस्त्यावर कारची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; दोघे जखमी

२४ ऑक्टोबरच्या रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपले होते. दुसऱ्या दिवशी, २५ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास सालगड्याला मुलगी घरात दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती आढळून आली नाही.

बेपत्ता झालेल्या तरुणीचे वय २१ वर्षे, रंग सावळा आणि उंची पाच फूट आहे. ती घरातून निघताना गुलाबी रंगाचा पंजाबी टॉप आणि काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान करून होती. तिचे शिक्षण नववीपर्यंत झाले असून, तिला मराठी भाषा बोलता येते.

 kidnapping cases
Kaij Sarpanch Hunger Strike | शिक्षक भरतीतील अनियमिततेच्या चौकशीसाठी सरपंचाचे आमरण उपोषण

मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.