चोरंबा येथे आगीत ५०० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू; १० शेळ्या बचावल्या

कुक्कुटपालन शेडला शॉर्टसर्किटमुळे आग
Fire in Choramba
चोरंबा येथील कुक्कुटपालन शेडला आग लागून ५०० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला.Pudhari News Network

धारूर: पुढारी वृत्तसेवा : चोरंबा (ता. धारूर) येथील शेतातील कुक्कुटपालन शेडला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ५०० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर १० शेळ्यांना वाचविताना शेतकरी जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि.८) मध्यरात्री दोन वाजता घडली. यात शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

Fire in Choramba
बीड : कार्यकारी अभियंत्‍याकडे आढळली ३ कोटी रूपयांची बेहिशेबी मालमत्ता

याबाबत अधिक माहिती अशी की, चोरंबा येथील शेतकरी विक्रम श्रीपती साक्रोडकर शेतीवर उपजीविका करतो. शेतीला जोडधंदा म्हणून त्याने कुक्कुटपालन व शेळीपालन केले होते. सोमवारी रात्री कोट्यामध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत ५०० कोंबड्या जळून खाक झाल्या. तर १० शेळ्या शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात यश आले. यावेळी विक्रम भाजून जखमी झाला.

Fire in Choramba
बीड : आष्टीत मुसळधार; कड्यातील पूल वाहून गेला

प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून तत्काळ मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहे. चोरंबा गावचे तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून प्राथमिक माहिती संबंधित विभागाला दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news