बीड : आष्टीत मुसळधार; कड्यातील पूल वाहून गेला

वाहनधारकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा; तहसीलदारांचे आवाहन
The bridge was washed away
कडा शहरातील पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला Pudhari News Network

आष्टी : तालुक्यातील कडा शहरात मागील अनेक महिन्यांपासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे. कडा येथे रहदारीसाठी केलेला पर्यायी पूल सोमवारी (दि.८) रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. यामुळे वाहनधारकांनी येण्या-जाण्यासाठी पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा, असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.

The bridge was washed away
Raigad Rain Update | मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. संबंधित विभागाकडून संथगतीने काम सुरू असल्याने अनेक अडचणीचा सामना प्रवाशी, वाहनधारकांना करावा लागत आहे. रस्ता काम करताना कडा येथील मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने रहदारीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून येथील स्मशानभूमीजवळ मातीचा भराव व त्याखाली नळकांड्या टाकून पूल करण्यात आला होता. सोमवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने कडीनदीला पाणी आल्याने हा पर्यायी पूल रात्री उशिरा वाहून गेल्याने संपर्क तुटला आहे. त्यामुळे आष्टीवरून कड्याला आणि नगरवरून कड्यामार्ग येणाऱ्या वाहनधारकांना पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news