

Farmer ends life after writing a letter to Chief Minister
वडवणी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील हरिश्चंद्र पिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकरी गोविंद रामराव शिंदे यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गोविंदचे वडील रामराव शिंदे हे शेतकरी. दोन मुले आणि एक मुलगी असा संसार. मोठ्या मुला-मुलीचा विवाह झालेला असून गोविंद हा दुसरा मुलगा. नेहमीप्रमाणे रविवारी रात्री तो वडिलांसह शेतात झोपण्यासाठी गेला होता. सोमवारी सकाळी वडिलांना गावात सोडून पुन्हा शेताकडे गेला; परंतु काही तासांतच त्याचा मृतदेह सापडला.
सततची नापिकी, शेतीमालाला न मिळणारा भाव, आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा कर्जाचा बोजा या : सगळ्यांचा ताण असह्य झाल्याने गोविंदने अखेर जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली. घटनास्थळी पोलिसांना मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहिलेली चार ओळींची चिठ्ठी आढळली. त्यात त्याने शेतीमालाला भाव नाही, बँक कर्जाचा ताण असह्य झाला, त्यामुळे हा निर्णय घेत आहे असे लिहून आपली व्यथा मांडली आहे.
पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आकस्मित मृत्यूची नोंद घेऊन पुढील तपास सुरू आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोविंदच्या शेतातील सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. उत्पन्नाचा आध- ारच कोलमडल्याने तो मानसिक ताण- ाखाली होता, असे कुटुंबीय सांगतात. गोविंद शिंदेच्या मृत्यूने बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा अस्वस्थ करणारा ठरला आहे.