Beed Crime : आडस येथे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला

आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी
Crime News
Crimepudhari
Published on
Updated on

केज ः केज तालुक्यातील आडस येथील बबन रावसाहेब मस्के यांनी आपल्या कुटुंबीयांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

दिनांक 4 मे 2026 रोजी सोमवारी शिवराज बबन मस्के, अशोक रावसाहेब मस्के, रवी सर्जेराव मस्के, सर्जेराव रावसाहेब मस्के, अर्चना अशोक मस्के तसेच किसकिंदा सर्जेराव मस्के यांनी पूर्वनियोजित कट रचून बबन रावसाहेब मस्के, त्यांचा मुलगा चंद्रकांत बबन मस्के, पत्नी शशिकला बबन मस्के व सासू वंचाबाई नारायण जगताप यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत बबन मस्के व वंचाबाई जगताप हे गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींवर उपचार सुरू असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Crime News
Solar electricity bill hike | सौर ऊर्जेवरील वीजबिलात मोठी वाढ

तक्रारीमध्ये अशोक रावसाहेब मस्के यांनी शासनाकडून अनुदान मिळालेल्या विहिरीचे हप्ते उचलूनही विहीर खोदली नसल्याचा तसेच तुती लागवडीच्या अनुदानातही गैरप्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे शासनाची फसवणूक झाल्याचेही तक्रारदारांनी म्हटले आहे.

Crime News
Matheran Road Block: माथेरानच्या रस्त्यावरून घोडे घसरण्याचे प्रमाण वाढले

तसेच शिवराज बबन मस्के यांच्यावर यापूर्वीही आई-वडिलांना मारहाण केल्याचे आरोप असून त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी व जखमी कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी बबन रावसाहेब मस्के यांनी प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news