Crackdown on fake doctor running illegal clinic|बोगस डॉक्टर दवाखाना थाटून बसला, आरोग्य विभागाला माहितीच नाही !

रुग्णांच्या जीविताशी खेळ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर कारवाईला वेग
Doctor
DoctorPudhari
Published on: 
Updated on: 

केज, पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय शिक्षण नसताना केवळ औषधांची तोंड ओळख असलेला ठक हा वैद्यकीय शिकणं पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र लावून त्या द्वारे रुग्णांची फसवणूक करीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून आरोग्य विभागाने धाडसी कारवाई करून त्याला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हा डॉक्टर पॅरॅक्टीस करत असतांना आरोग्य विभागाला मात्र याबाबत माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बोरगाव येथे बोगस डॉक्टर विलास बन याच्याकडे वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही पदवी किंवा शिक्षण घेतलेली नसताना बनावट व खोटे प्रमाणपत्र तयार दर्शनी भागात लावून ते बोगस वैद्यकीय प्रॅक्टिस करीत असल्याची माहिती एका गुप्त माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्या वरून दि. २७ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. मुंडे, आरोग्य विस्तार अधिकारी छाया जाधव यांनी पोलिस पथकातील पोलिस हेडकॉन्स्टेबल दराडे, गोरख फड यांच्यासह दुपारी बोरगाव तालुका केज येथे कारवाई केली.

त्यावेळी बोगस डॉक्टर हा त्याच्याकडे वैद्यकीय उपचार आणि प्रॅक्टिस या बाबत अधिकृत शिक्षण किंवा पदवी किंवा नोंदणी नसताना औषधोपचार करीत असल्याचे आढळून आले. त्या बोगस डॉक्टरला आरोग्य विभागाच्या पथकाने अत्यंत शिताफीने बोगस डॉक्टर विलास बन याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या कडून विविध औषधी आणि साहित्य देखील ताब्यात घेतले आहे. डॉ. मुंडे यांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Doctor
Beed News : बीड जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर

बैठकीनंतर कारवाईसाठी धावपळ

जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर असून ते रुग्णांची फसवणूक करीत असल्याचे त्यांच्यावर कारवाई करणे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. त्यानंतर कारवाईसाठी धावपळ करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षक, एम पी डब्ल्यू, आशा स्वंयसेविका, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आणि सरपंच हे सर्व जबाबदार असताना ते कसे काय गप्प होते. जबाबदारी टाकणाऱ्या अशा सर्वावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, विलास बन याच्याकडे कोणतीही पदवी किंवा प्रमाणपत्र नसताना तो उपचारासाठी लागणारे औषधी आणि साहित्य कुठून खरेदी करीत असावा याची सुद्धा सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Doctor
Sugarcane burnt in Beed and Dharashiv| बीड आणि धाराशिव जिल्ह्यात ५५ एकर ऊस जळून खाक

बोगस डॉक्टरची माहिती कळवा : डॉ. मुंडे

गावात किंवा परिसरात अशा प्रकारे बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करीत असतील त्याची माहिती आरोग्य विभागाला द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मुंडे यांनी केले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news