

Even before the Kumbh Mela in Nashik, a religious atmosphere similar to the Kumbh Mela prevailed in Parli.
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवाः वृंदावनच्या मुलुकपिठाचे पीठाधीश्वर प्रसिद्ध गोसेवक संत स्वामी राजेंद्रदास देवाचार्य महाराज हे सातशे साधुंसह गोदा वरी परिक्रमा यात्रा करत आहेत. ही यात्रा पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथे दाखल झाली. एक दिवसाचा मुक्काम आणि प्रभू वैद्यनाथला रुद्राभिषेक असा दोन दिवसाचा धार्मिक सोहळा साजरा झाला. साधुसंत, भगवी वस्त्र परिधान केलेले, पिवळे वस्त्र परिधान केलेले, जटा वाढलेले वेगवेगळ्या मुद्रा धारण केलेले असे वेगवेगळ्या सांप्रदायाचे साधू यांनी वैद्यनाथ मंदिर परिसर गजबजून गेला होता. नाशिक येथे पुढच्या वर्षी कुंभमेळा होणार आहे. मात्र या कुंभाआधीच परळीच्या वैद्यनाथ मंदिरात दोन दिवसाचा कुंभमेळाच भरल्यासारखे चित्र बघायला मिळाले. या गोदावरी परिक्रमा यात्रेचे परळीकर भाविकांनी जोरदार स्वागत केले.
याप्रसंगी आध्यात्मिक, सामाजिक व राजकीय विषयावर वार्तालाप करताना त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. भारतीय संस्कृती, हिंदू धर्म एकता, गोदावरी परिक्रमेचे महत्त्व आदी विषयावर त्यांनी वार्तालाप केला. यावेळी माध्यमांशी बोलताना प.पू. राजेंद्रदास महाराज यांनी सांगितले की, गोदावरी परिक्रमा ही आपली पुरातन परंपरा परंतु गेल्या काही वर्षापासून गोदा वरी परिक्रमा काहीशी लुप्त होत चाललेली आहे.
वेद, महाभारत, अठरा पुराणे यामध्ये गोदावरीचे अनंत महात्म्य वर्णन केले आहे. पूर्व काळात पूज्य संत महापु रुष गोदावरीची परक्रमा करत असायचे. आजकाल हे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येते. आपली ही महान सांस्कृतिक परंपरा अधिकाधिक जपण्यासाठी संपूर्ण भारतवर्शातील संत, महापुरुष, आस्तिक लोकानी गोदावरी परिक्रमा करावी असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थांचे पूजन करून गोदावरी परिक्रमेला प्रारंभ झाला असून वीस तारखेला पुन्हा नाशिक येथे राम यज्ञाने या परिक्रमेची सांगता होणार आहे.