

केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊस तोडणीसाठी आपल्या मोठ्या बहिणी सोबत आलेल्या एका १२ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने अत्याचाराचा कळस करून तिचे तोंड दाबून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
एका अल्पवयीन मुलीची आई ही भोळसर स्वभावाची असून तिचे वडील कर्नाटक या परराज्यात ऊस तोडणीसाठी गेले आहेत. ती मुलगी ६ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. वडील ऊस तोडणीसाठी परराज्यात गेले असल्याने ती मुलगी तिच्या ऊसतोडणी मजूर म्हणून कामासाठी केज तालुक्यात भालगाव येथील ऊस तोड मजुरांच्या शेतातील वस्तीवर विवाहित बहिणी सोबत राहात होती. तिच्या बहिणी आणि मेव्हण्याने धारूर तालुक्यातील ऊसतोड मुकादम यांची उचल घेतली असल्याने ते केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाणे हद्दीत असलेल्या तालुक्यातील भालगाव येथे काम करीत होते.
दि.१५ डिसेंबर रोजी सोमवा रोजी रात्री ८:०० च्या सुमारास सर्वजण उसाच्या शेतात असताना अल्पवयी मुलगी एकटीच त्यांच्या शेतातील ऊस तोड मजुरांच्या वस्तीवर असलेल्या कोपीवर एकटीच होती. ती संधी साधून आरोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे वय (३४ वर्ष) (रा. सोमनाथ बोरगाव ता. अंबाजोगाई) हा तेथे गेला आणि त्याने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार लैंगिक अत्याचार केला. या प्रकारा नंतर घाबरलेल्या त्या अल्पवयीन मुलीने ही घटना तिची बहीण घरी वस्तीवर आल्या नंतर तिला सांगितली. त्या नंतर तिला घेऊन तिची बहीण ही युसुफवडगाव पोलिस ठाण्यात हजर झाली. त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे यांनी या गंभीर गुन्ह्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना दिली. अल्पवयीन पीडित मुलीच्या तक्रारी वरून नराधम लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे याच्या विरुद्ध पोक्सो आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्या नंतर पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करून आरोपीला जेरबंद करण्यासाठी पथक तैनात केली. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.
झडप टाकून आरोपीला पकडले
गुन्हा केल्या नंतर आरोपीला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती.मिळताच तो पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिस निरीक्षक भीमराव मांजरे, पोलिस उपनिरीक्षक भारत बरडे, पिंक पथकाचे पोलिस निरीक्षक प्रकाश शेळके, पोलिस कॉन्स्टेबल भागवत निरडे आणि युसुफवडगाव ठाण्याचे कर्मचारी यांनी नराधम आरोपींच्या मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला. त्याचे मोबाईल लोकेशन हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे असल्याचे निष्पन्न होताच आरोपी एसटीने फरार होऊ शकतो असा अंदाज काढून पोलिस बस स्टँडच्या परिसरात दबा धरून बसले. आरोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे हा दि. १७ डिसेंबर बुधवार रोजी दुपारी ४:३० वा. च्या सुमारास कळंब बस स्टँडवर येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
नराधम आरोपीची बायको त्याच्या पासून राहते विभक्त
या अत्यंत संतापजनक घटनेतील आरोपी लक्ष्मण ऊर्फ सागर निवृत्ती वाघमारे हा दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याची बायको त्याच्या पासून विभक्त राहत आहे. ती ऊस तोड मजूर म्हणून काम करीत आहे. त्याची बायको ही पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणी सोबत ऊसतोडणी करण्यासाठी आली असल्याची माहिती त्याला मिळाली. म्हणून तो तिला शोधत तिला भेटण्यासाठी गेला होता. मात्र त्याची बायको ही उसाच्या फडात काम करीत होती. त्यावेळी वस्तीवरच्या कोपीवर असलेल्या अल्पवयीन मुलीवर त्याने लैंगिक अत्याचार केला.
आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी
पोलिसांनी आरोपीला केज न्यायालयात हजर केले असता घटनेचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने त्याला दि. २२ डिसेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.