Beed News : पुतण्याच्या त्रासाला कंटाळून वृद्ध महिलेने जीवन संपवले

बेलुरा येथील घटना; ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
Beed News
Beed News : पुतण्याच्या त्रासाला कंटाळून वृद्ध महिलेने जीवन संपवलेfile photo
Published on
Updated on

Elderly woman ends her life, driven to despair by her nephew's harassment

बीड, पुढारी वृत्तसेवा : बेलुरा (ता. जि. बीड) येथे 67 वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 16 सप्टेंबर रोजी पहाटे घडली. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या पुतण्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सततची शिवीगाळ, मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे मानसिक त्रास आणि भीती निर्माण झाल्याने महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Beed News
Beed News | केज तालुक्यात बोबडेवाडी येथील दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने घेतला टोकाचा निर्णय!

कालिदा होले (67) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. 15 सप्टेंबर रोजी रात्री सुमारास अंगद होले यांच्या घरासमोर त्यांचे चुलत भाऊ संतोष बाळू होले व त्यांची पत्नी रंजना संतोष होले आले. त्यांनी अंगद, त्यांची पत्नी सुलभा आणि आई कालिंदा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी रंजनाने सुलभा यांचे केस धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अंगद यांच्या हाताला रंजनाने चावा घेतल्याचे, तर संतोषने अंगद यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यानंतर दोघांनी अंगद व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली तसेच घराच्या दरवाजावर व पत्र्यावर दगडफेक केल्याचा आरोप आहे. मारहाणीत जखमी झाल्याने अंगद व त्यांच्या पत्नीने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. या घटनेनंतर कुटुंबीय भीतीपोटी नातेवाईकाच्या घरी झोपण्यासाठी गेले होते.

Beed News
Beed News : शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकार राजकारणात व्यस्त : रोहित पवारांचा आरोप

दरम्यान, 16 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वापाचच्या सुमारास कालिंदा रघुनाथ होले यांनी राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी पाइपला साडीच्या काठाने गळफास घेऊन आत्महत्या केली. संतोष व रंजना यांच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून तसेच जीवे मारण्याच्या भीतीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात संतोष बाळू होले आणि रंजना संतोष होले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास उत्तमराव सोनवणे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news