

Elderly farmer ends life Dhakanwadi
केज : केज तालुक्यातील ढाकणवाडी येथे एका वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना आज (दि.२६) पहाटे घडली आहे. रामभाऊ नानाभाऊ ढाकणे (रा. ढाकणवाडी ता. केज) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरघाट (ता. केज) जवळ असलेल्या ढाकणवाडी येथे आज पहाटे ५ वाजता रामभाऊ ढाकणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. त्यांना एक ते दीड एकर जमीन असून ते इतरांची शेती देखील बटईने करीत होते. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून नेल्याने ते निराश झाले होते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.