

बीड : पुढारी वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बीड दौरा पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या राज्य प्रवक्ता हेमा पिंपळे यांना नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील विविध मागण्यांसाठी हेमा पिंपळे आंदोलन करणार होत्या. मात्र त्यापूर्वीच त्यांना सकाळपासून नजर कैदेत ठेवले गेले आहे. बीड पोलीस पिंपळे यांच्या निवासस्थानाबाहेर ठाण मांडून आहेत.