Kej cattle rescue : केज येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय प्राण्यांची सुटका

व्यंकटराम यांच्या पथकाची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Kej cattle rescue
केज येथे कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या आठ गोवंशीय प्राण्यांची सुटकाpudhari photo
Published on
Updated on

केज : केज तालुक्यात कत्तलीच्या उद्देशाने शेतात डांबून ठेवण्यात आलेल्या आठ गोवंशीय प्राण्यांची पोलिसांनी सुटका केली असून या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक व्यंकटराम (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 मे रोजी सकाळी सहायक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, केज येथील टाकळी मार्गावरील सौंदडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेत परिसरात काही गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आली आहेत. माहितीच्या आधारे सहायक पोलिस अधीक्षकांनी विशेष पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अमीरुद्दीन इनामदार, पोलिस हवालदार बालासाहेब डापकर, धोंडीराम मोरे, राजू वंजारे, विशाल क्षीरसागर व विकास चोपणे यांनी संबंधित शेतात धाड टाकली.

Kej cattle rescue
Ashok Kharat Case: भोंदूबाबा प्रकरणात मोठा खुलासा; ‘शिवानिका’ला पाणी देण्याच्या आदेशाची चौकशी

या कारवाईदरम्यान बैल, गाय व गोऱ्हे असे एकूण आठ गोवंशीय प्राणी आढळून आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्राण्यांची अंदाजे किंमत 1 लाख 63 हजार रुपये असून त्यांना कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवण्यात आले होते. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचताच संशयित भागवत बारीकराव पारवे (रा. केज) आणि नौशाद उस्मान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज) हे दोघे तेथून पसार झाले.

Kej cattle rescue
Nanded Crime : गुन्हेगारी टोळीतील दोघे सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार

या प्रकरणी पोलिस हवालदार राजू वंजारे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात संबंधित दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news