

Drunk Assault Case
केज : केज तालुक्यात युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कौडगाव येथे एका मद्य प्राशन करून नशेत असलेल्या एकाने एकाच्या कानाला चावा घेऊन जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.६) घडली.
केज तालुक्यातील कौडगाव येथील रामचंद्र उध्दव वाळके हे सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजता गावातील दूध डेअरी समोर उभे असताना ज्ञानेश्वर पाडुरंग पवार हा दारू पिऊन मोठमोठ्याने बडबड करीत त्यांच्याकडे आला आणि रामचंद्र वाळके यांच्या डाव्या कानाला चावा घेवून कानाचा अर्धा तुकडा तोडून जखमी केले.
याप्रकरणी रामचंद्र वाळके यांनी दिलेल्या तक्रारी वरून ज्ञानेश्वर पवार यांच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नवनाथ वारे पुढील तपास करीत आहेत.