Beed Municipality News
...अशी सेवा शहरवासीयांना मिळावी !file photo

...अशी सेवा शहरवासीयांना मिळावी !

बीड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या तत्परतेची होतेय चर्चा
Published on

Discussion is underway on the readiness of the sanitation department of Beed Municipality

बीड, पुढारी वृत्तसेवा: बीड शहरातील स्वच्छतेचा प्रश्न कायम चर्चेत असतो. तो सोडवण्यासाठी आता नूतन नगराध्यक्ष, सभापती तसेच नगरसेवकदेखील कामाला लागले आहेत. यासाठीच संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान देखील राबवले जाणार आहे. याची प्रचिती अगदी दुसन्याच दिवशी आली. शहरातील नगर रोडवर असलेल्या एका हॉटेलसमोर एक घंटागाडी जवळपास अर्धा तास उभा होती, त्या ठिकाणचा कचराही त्या गाडीत टाकला जात होता, स्वच्छतेसाठी अशी तत्परता शहराच्या सर्वच भागात आता नगरपालिका दाखवणार असल्याच्या चर्चेने मात्र जोर धरला आहे.

Beed Municipality News
Beed Crime | माजलगावात कट मारल्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

बीड नगरपालिकेत गेल्या तीस-पस्तीस वर्षांनंतर सत्ताबदल झाला आहे. नूतन नगराध्यक्ष, सभापती व नगरसेवक बेट रस्त्यावर उतरून स्वच्छतेसह विविध प्रश्नही सोडवत असल्याचे समाजमाध्यमातील पोस्टवर दिसत आहे. यातही बीडमध्ये सर्वात महत्त्वाच्या असलेल्या पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर काम करणे अपेक्षित असताना गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह सभापती व नगरसेवकांनी पाणी पुरवठा प्रकल्पाच्या उद्भवापासून ते बीड शहरातील जलकुंभापर्यंत आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, त्यातून काय सुधारणा झाली, हे अद्याप समोर आले नसले तरी लवकरच बदल दिसेल अशी अपेक्षा आहे. या दरम्यानच बीड शहरातील स्वच्छतेचा प्रश्न देखील चर्चीला जाऊ लागला होता. याकरिता नगराध्यक्षांसह सभापती व नगरसेवकांनी एक बैठकही घेतली. स्वतः स्वच्छता सभापतींनी थेट डंपिंग ग्राऊंडपर्यंत होऊन पाहणी केली आहे. परंतु शहरातील पाहणी त्यांनी केली अथवा नाही, हे मात्र समजू शकलेले नाही.

याचदरम्यान नगरपालिकेने सुरू केलेल्या या स्वच्छता अभियानाचा प्रत्यय नगर रोडवर आला. रविवारची सकाळ असल्याने या रोडवर फारशी गर्दी नव्हती. याच रोडवरील एका प्रसिद्ध हॉटलसमोर घंटागाडी उभा होती, त्या ठिकाणचे कर्मचारी घंटागाडीत कचरा टाकत होते, हे चित्र पाहून बीडच्या स्वच्छतेला चांगल्या पद्धतीने सुरुवात झाल्याचे जाणवत होते. अगदी अशीच सेवा आता बीड शहरातील सर्व व्यावसायिकांबरोबरच नागरिकांनाही एकूणच बीड सत्तांतरानंतर मिळणार असल्याचे दिसते. नगरपालिकेत झालेल्या नगरपालिकेचा स्वच्छता विभाग अशा पद्धतीने तत्पर होऊ शकतो, हेसुद्धा दिसून आले.

Beed Municipality News
Beed Murder Case: सोशल मीडियावरील स्टोरीचा वाद जीवावर बेतला; रुईनालकोलमध्ये तरुणाचा खून, दोघे गंभीर

न.प. कडून युद्धपातळीवर प्रयत्न निजाम शेख

बीड शहरातील जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून संधी दिली. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चाळीस घंटागाड्या आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून आम्ही शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. नागरिकांनीही यात सहभाग नोंदवायला हवा, सहकार्य ठेवायला हवे, कचरा घंटागाडीतच टाकला गेल्यास स्वच्छतेसाठी काही वेगळे आणि विशेष करावे लागणार नाही. आमच्याकडे उपलब्ध यंत्रणेकडून शक्य होईल तेव्हढी स्वच्छता ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच राहणार असल्याचे स्वच्छता सभापती शेख निजाम यांनी सांगितले.

मुख्य रस्त्यावरील कचरा पॉइंट !

अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाते. परंतु बीड शहरात मात्र याच्या विपरीत चित्र आहे. नगर रोड, बार्शी रोड, जालना रोडवरही काही ठिकाणे ही कचरा पॉइंट म्हणून ओळखली जाऊ लागली आहेत. या ठिकाणी असलेल्या कचराकुंड्या ओसंडून बाहत असतात. त्या भोवती कुत्रे आणि मोकाट जनावरांचा वावर असतो, हे चित्र कायम पहायला मिळते. हे कचरा पॉइंट कधी हटवले जाणार, हा प्रश्न कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news