Beed Murder Case: सोशल मीडियावरील स्टोरीचा वाद जीवावर बेतला; रुईनालकोलमध्ये तरुणाचा खून, दोघे गंभीर

सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टेटस आणि स्टोरी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद भीषण हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना रुईनालकोल येथे घडली.
Beed Murder Case
Beed Murder Casefile photo
Published on
Updated on

Beed Murder Case

कडा : सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टेटस आणि स्टोरी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद भीषण हाणामारीत बदलल्याची धक्कादायक घटना रुईनालकोल (ता. आष्टी) येथे सोमवारी रात्री घडली. या घटनेत २० वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला असून त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

Beed Murder Case
viral video: मायेला मरण नसते! सौदीचा तरुण हिंदू महिलेच्या भेटीसाठी थेट केरळमध्ये! पाहा हृदयस्पर्शी Video!

नेमकी घटना काय?

रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात टाकलेल्या स्टोरीवरून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही गटांत धुसफूस सुरू होती. सोशल मीडियावरील हा वाद अखेर प्रत्यक्षात भिडला आणि त्याचे रूपांतर रक्तरंजित हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका गटातील तरुणांनी धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर सपासप वार केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

या हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०, रा. रुईनालकोल) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत असलेले अन्य दोन तरुणही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

Beed Murder Case
Most Popular Indian Note: भारतात सर्वाधिक किती रुपयांची नोट चलनात आहे? पाहा आरबीआयची आकडेवारी

पोलीस प्रशासनाची धाव

घटनेची माहिती मिळताच आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नरवाडे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावात सध्या तणावाचे वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक नेमण्यात आले आहे. सोशल मीडियावरील किरकोळ वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news