Dharur Fort Conservation : संवर्धन कामावर अभियंत्यांचे ‘व्हॉट्सॲप’वरून नियंत्रण!

अभियंत्याकडून पाठविलेल्या फोटोंवरून मार्गदर्शन; नऊ कोटींच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
Dharur Fort Conservation
Dharur Fort Conservationpudhari photo
Published on: 
Updated on: 

धारूर : येथील ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या धारूरच्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी तब्बल ८ कोटी ९८ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महावारसा विशेष स्मारक योजनेतून सुरू असलेल्या या कामाला दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या खर्चाच्या कामावर प्रत्यक्ष देखरेख करण्याऐवजी पुरातत्त्व विभाग संबंधित कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंते सह पहारेकरी कर्मचाऱ्याने व्हॉट्सॲपवर पाठविलेल्या फोटोंवरूनच मार्गदर्शन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार शनिवार 31 ऑक्टोबर रोजी समोर आला. त्यामुळे ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धारूरचा ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षित स्मारक असून त्याच्या संवर्धनासाठी शासनाने महावारसा विशेष स्मारक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला आहे. नागपूर येथील बीएसएस कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट मिळाले आहे. अंबाजोगाई येथील आर्किटेक्ट या वास्तुविशारद संस्थेचा आराखडा आणि पुरातत्त्व विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Dharur Fort Conservation
Dharashiv Labour Protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हजारो मजुरांचा मोर्चा

किल्ल्यातील झाडेझुडपे हटविणे, कोसळलेली तटबंदी पुन्हा उभारणे, प्रवेशद्वाराची दुरुस्ती, चुनामिश्रित गिलावा, ग्राउटिंग, कंगोरे आणि फरशीची कामे प्रस्तावित आहेत.सध्या किल्ल्यात ढासळलेल्या तटबंदीचे बांधकाम आणि जुन्या भिंतींमधील सांधे भरण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामावर पुरातत्त्व विभागाच्या अभियंत्यांची प्रत्यक्ष देखरेख कितपत आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुरातत्त्व विभागाने कॉन्ट्रॅक्ट दारावरच सर्व सोपवले आहे.

कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता अनुपम गणगारे व पहारेकरी कर्मचाऱ्यांची कामाच्या पाहणीसाठी नियुक्ती केल्याचे सांगण्यात येते. कंपनीचा अभियंता काम सुरू असताना मोबाईलमध्ये फोटो काढून संबंधित अभियंत्यांना व्हॉट्सॲपवर पाठविते. त्याच फोटोंच्या आधारे अभियंत्यांकडून मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती संबंधित कंपनीचा अभियंता यांनी दिली शनिवारी याबाबत अधिक चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीने तेथून काढता पाय घेतला.

Dharur Fort Conservation
Jalna Agriculture News : पहिल्याच वेचणीत कपाशीचा धुरळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.