

Dharur city Shri Ambachondi Mata
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर शहराच्या उत्तरेस डोंगराच्या कुशीत निसर्ग रम्य वातावरणात असनारे श्री अंबाचोंडी मातेचे मंदिर. शहराची ग्रामदैवत म्हणन ओळखली जाणारी आणि भक्ताच्या नवसाला पावणारी म्हन हि माता धारूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. येथील देवीला सप्तशृंगीदेवीचे उपपिठ म्हणून ओळखले जाते. नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली असून घट स्थापना मोठ्या उत्साह मध्ये होणार असल्याचे तेथील पुजारी शंकर देवा पुजारी यांनी सांगितले.
नवरात्रच्या निमित्ताने जिल्ह्यासह महाराष्ट्रातुन भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी दिसुन येत, बालाघाट पर्वत रांगाच्या पायथ्याशी धारूर शहरापासन अवघ्या तीन किमी अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचे बांधकाम अतीशय प्राचीन दगडात करण्यात आलेले आहे. मंदिराच्या चौहबाजुने उंच डोंगर असुन निसर्गाच्या सानिध्यांत हे मंदिर वसलेले आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार राजमाता आहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितले जाते. भक्तांच्या नवसाला पावणारी अंबाचोंडी माता संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे.
नवरात्रात या ठिकाणी मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच हजारो भाविक मोठ्या भक्तीभावाने या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. नाशिक जिल्ह्यातील संप्तश्रृंगी देवीचे हे उपपीठ म्हणुन हे मंदिर राज्यभर प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या पायथ्याशी दक्षिणे कडुन उत्तरे कडे बारमाही वाहणारी नदी असुन निसर्गाच्या सानिध्यांत हे मंदिर वसलेले आहे.
या ठिकाणी मंदीरापर्यंत डांबरीकरण झाले असून माजी केंद्रीय मंत्री शहराचे भुमिपूत्र जयसिंगराव गायकवाड यांनी येथे सभागृहाचे बांधकाम खासदार निधीतुन केले असून भक्ताना हा निवारा झाला आहे तर येथील उदयसिंह दिक्कत यांनी ही या ठिकाणी सुशोभीकरण तसेच सीसीटीव्ही कॅमेरे साठी योगदान दिले आहे.. या मंदीराचे पुजारी शंकर देवा पुजारी सह नारायण पुजारी, लक्ष्मण पुजारी हे या मंदीराचे पुजारी असून ते या मंदीराचे इतिहासाची अनेक उदाहरणे सांगतात. नवरात्र महोत्सव निमित्त घटस्थापनेची पूर्ण तयारी झाली असून घट स्थापना मोठ्या उत्साहामध्ये स्थापन होणार असल्याचे पुजारी शंकर देवा यांनी सांगितले.