

Demand for millet increases as cold weather sets in
टाकरवन, पुढारी वृत्तसेवा : थंडीची चाहूल लागल्याने मार्केट यार्ड मधील भुसार बाजारात बाजरीला मागणी वाढली आहे. बाजरी ही उष्ण असल्याने थंडीत आवर्जून खाल्ली जाते तर ऊसतोड कामगाराकडून बाजरीला मोठी मागणी असते त्यामुळे सध्या बाजरीला मागणी वाढत आहे. यंदा सततच्या पावसामुळे बाजरी आणि ज्वारीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे बाजरी ज्वारीचे दर क्विंटल 'मागे सहाशे ते आठशे रुपयांनी वाढले आहेत. तर प्रति किलो सहा ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे यंदा दर तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाजरीच्या प्रतवारीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे बाजारात चांगल्या प्रतीच्या मालाची आवक केवळ ३० टक्के तर हलक्या व काळवट मालाचे प्रमाण ७० टक्के असल्याने बाजारात चांगल्या मालाला अधिक मागणी आहे सध्या मार्केट यार्ड भुसार बाजारात दररोज १० ते २० टन बाजरी आणि ज्वारी आवक होत आहे.
महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू झाल्यानंतर बाजरीच्या मागणीत वाढ होत आहे. सततच्या पावसामुळे बाजरी ज्वारीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले आहे यामुळे याची आर्थिक बाजरी हे एक उष्ण धान्य मानले जाते थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीराला उबदार-पणा मिळतो आणि थंडीचा प्रभाव कमी होतो हे एक नैसर्गिक उपाय आहे. त्याचबरोबर बाजरीमध्ये पौष्टिक मूल्य आणि प्रतिकारक शक्ती असे अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात जे थंडीत शरीरासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे थंडीच्या दिवसात बाजरीची मागणी अधिक असते.