Beed News : शिक्षक भरतीप्रकरणी दोन शिक्षणाधिकारी निलंबित

एसआयटीचा दणका, शिक्षणाधिकारी गेले घरी, आता संस्थाचालकांची बारी
Beed News
Beed News : शिक्षक भरतीप्रकरणी दोन शिक्षणाधिकारी निलंबितFile Photo
Published on
Updated on

Beed News: Two education officers suspended in teacher recruitment case

बीड,पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रीये मध्ये संस्थाचालाकाशी संगनमत करून बोगस भरती केल्या प्रकरणी शासनाने बीड येथील शिक्षणाधिकारी भगवंत फुलारी व नागनाथ शिंदे या दोघांवर निलंबनाची कारवाई केली असून एसआयटीच्या या दणक्याने दोन शिक्षणाधिकारी गेले घरी आता चालाकाची बारी आहे. दैनिक पुढारीने सातत्याने लावून धरलेल्या या घोटाळ्याची दखल घेण्यात आली आहे. संख्या

Beed News
Municipal Council Election : सोशल मीडिया उमेदवारांना प्रचारासाठी नवा पर्याय

बीड जिल्ह्यात सन २०१२ पासून शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांची बोगस भरती करण्यात आली, शालार्थ आयडी या अप च्या माध्यमातून संस्थाचालाकानी शिक्षण विभागातील काही कर्मचारी आणि प्राथमिक तसेच माध्यमिक चे शिक्षणाधिकारी भगवंत फुलारी, नागनाथ शिंदे यांच्याशी संगनमत करून बोगस भरती केली.

या भरती प्रकरणी दैनिक पुढारीने सातत्याने यावर आवाज उठविला हा आवाज उठविताना अनेकांनी वेगवेगळ्या माध्यमातून हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला मात्र अशा घोटालेबाज लोकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा होणे गरजेचे असल्याने यावर ठाम भूमिका घेत वार्तांकन केले. दैनिक पुढारी च्या वार्तांकनाची थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला, एवढेच नाही तर एसआयटी मध्ये आयएएस, आयपीएस अशी अधिकारी नेमून याची सखोल चौकशी केली. एसआयटीने याची सर्व पातळीवर सखोल चौकशी केली. यात शिक्षण विभागासह बाकीचे देखील संबंधित विभाग त्याच बरोबर संस्था चालक यांची देख्गील वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी केली, यात पोलीस विभाग मार्फत तसेच सनदी अधिकार्याच्या माध्यमातून हि चौकशी करण्यात आली.

Beed News
leopard News : बिबट्यापासून शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी दिवसा वीज पुरवठ्याची मागणी

या बोगस भरती मध्ये जे जे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्माची भरती झाले आहेत त्यांची देखील सखोल चौकशी करण्यात आली. दरम्यान एसआयटी ने केलेल्या चौकशी मध्ये सर्व प्रथम बीड जिल्ह्यातील माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, भगवंत फुलारी हे दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर शिक्षण आयुक्त यांनी तत्काळ चौकशी अहवाल नुसार निलंबनाची कारवाई केली.

एसआयटीने केलेल्या चौकशी मध्ये सर्वात आधी शिक्षणाधिकारी यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आल्या नंतर आता या संबंधी इतर विभागातील अधिकारी यांची देखील या अहवालानुसार जवाबदारी निश्चित करून त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पथकाने सांगितले.

याच बरोबर ज्या ज्या शिक्षण संस्थेत अशा पद्धतीने बोगस भरती करण्यात आली आहे, त्या संस्था चालक तसेच भरती झालेल्या बोगस शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यावर देखील कारवाईची टांगती तलवार आहे. शिक्षणाधिकारी यांचा बोगस भरती प्रक्रियेमध्ये एसआयटीला सहभाग आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आता संस्था चालकांची तसेच बोगस भरती झालेल्या शिक्षकांची वारी..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news