Milk Price News : दुधाच्या भाववाढीमुळे गायी, म्हशींना मागणी वाढली

दुधाळ जनावरांना बाजारात लाखमोलाचा भाव; भेसळ रोखल्याचा परिणाम
Milk Price News
Milk Price News : दुधाच्या भाववाढीमुळे गायी, म्हशींना मागणी वाढलीfile photo
Published on
Updated on

Demand for cows and buffaloes has increased due to the rise in milk prices

नेकनुर, पुढारी वृत्तसेवा : मागच्या महिनाभरात भेसळ कमी झाल्याने दुधाचे भाव वाढले आणि गाय, म्हशीच्या खरेदीला तेजी आली सध्या नेकनुरच्या आठवडी बाजारात जर्सी गाय लाखाच्या घरात गेली असून म्हशीला एक लाख ते दीड लाख रुपयांची किंमत मिळू लागली नेकनुरच्या बाजारात एक लाख ८० हजाराला म्हशीची विक्री झाली. रविवारी दोनशे दुधाळ जनावराची खरेदी विक्री होऊ लागली आहे. भेसळ थांबल्याने दुधाच्या जनावरांना लाख मोलाची किंमत आली आहे.

Milk Price News
Jalna News : पांढऱ्या तुरीला ७,८०० तर राईला ७,९५० रुपयांचा सर्वोच्च दर !

शेतकऱ्यांना बाजारहाट भागवण्यासाठी शेतीसोबत गाई म्हशींची जोड ठेवावी लागते. मात्र मागच्या काही वर्षात पावसाचा लहरीपणा त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न आणि पशुखाद्याचे वाढते भाव शेतकऱ्यांना जनावरे नकोशी झाली होती. मात्र मागच्या दोन महिन्यापासून अन्न औषधे प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे दाखल झाले आणि दुधातील भेसळ निशाण्यावर आल्याने हळूहळू भेसळ कमी होत असल्याने दुधाचा तुटवडा निर्माण झाला.

परिणामी दुधाची मागणी वाढली, त्यामुळे भाववाढ झाली. गायीच्या दुधाचा दर तीस रुपये होता तो आता चाळीस रुपये झाला तर म्हशीचे दुध ६० ते ८० रुपये प्रति लिटर होता तो आता ग्रामीण भागात ८० तर शहरात १०० रुपये झाल्याने पुन्हा शेतकरी गायी, म्हशी खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात येत असल्याने दुधाळ जनावरांना भाव आला आहे.

Milk Price News
Renapur fodder crisis : वाळलेला कडबा सात हजार रुपये टन

दूध देण्याचे गणित बांधून म्हशीला लाख रुपयाच्या पुढे किंमत मिळत असून गायी ही आता ७० हजार ते एक लाख रुपयांचा भाव घेत आहेत. सध्या दुधाची भेसळ कमी झाल्याने दुधाळ जनावरांना चांगली किंमत मिळत असल्याचे पहायला मिळते. दुधाचे दर वाढले असल्याने आता अनेक शेतकरी देखील या व्यवसायाकडे वळत आहेत.

दुधाळ जनावरांना चांगला भाव

दुधाचे भाव वाढले असल्याने पुन्हा एकदा शेतकरी दुधाळ जनावरांच्या खरेदीकडे वळलेले दिसत असून दोनच महिन्यात लाख रुपयाची म्हैस वीस ते तीस हजार रुपयांनी जास्त खरेदी, विक्री होऊ लागली आहे. दहा लिटर दूध देणाऱ्या चांगल्या म्हशीला दीड लाख रुपयांचा भाव मिळत असल्याचे व्यापारी संतोष नन्नवरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news